आजचे राशिभविष्य13 August 2024 :लेखणी बुलंद टीम
मेष: रोजच्या कलकलाटातून शांतीचा अनुभव घ्याल. सामाजिक काम करणाऱ्यांना भरपूर सहकार्य मिळेल.
वृषभ: आज हातून काम चांगले होईल. तुमच्या बुद्धीचा योग्य उपयोग करून घ्याल.
मिथुन: पैसा मिळाला तरी खर्चाला मर्यादा राहणार नाही, त्यामुळे आवश्यक गोष्टींची यादी करून खर्च करा.
कर्क: छोटे मोठे प्रवासाचे योग येतील. कुटुंबाने मित्रांसमवेत सहलीला जाण्याचे बेत ठरवाल.
सिंह: अचानक एखादे जुने येणे वसूल होण्याची शक्यता. महिला शांती आणि समाधानाचा आस्वाद घेतील.
कन्या: प्रतिकूल परिस्थितीमध्येही काम चालू ठेवणार आहात. एखाद्या दुर्मिळ संधीबद्दल उगीचच निरीच्छपणा दाखवाल.
तूळ: रसिक असूनही अरसिकतेचा बुरखा पांघरून ताण वाढवायचे कारण नाही. कोणताही ताण न ठेवता आनंदी राहा.
वृश्चिक: कोणत्याही अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करू शकता.
धनु: परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन त्याप्रमाणे वागणूक ठेवावी.
मकर: नोकरीमध्ये अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह होईल, तेव्हा सांभाळा.
कुंभ: मुलांना चार उपदेशाचे शब्द सांगावेसे वाटतील, परंतु त्यामुळे निराशा पदरात पडण्याची शक्यता आहे.
मीन: समस्यांचा योग्य क्रम लावल्यास त्यावर मात करता येईल
टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)