आत्तापर्यंत किती महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे? बाकीच्यांच्या खात्यात कधी येणार?

Spread the love

लेखणीबुलंद टीम:

 

राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्ट 2024 ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापूर्वी 15 ऑगस्टचे निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किती महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. त्यानुसार राज्यातील 35 लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तसेच महिन्याअखेर सव्वा कोटी महिल्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले.

 

1.25 कोटी महिलांच्या खात्यात

पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाच उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातही माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याचा आनंद आहे. आता 17 तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. अनेक टीका झाल्या पण बुधवारी 35 लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. तसेच आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर आम्ही पैसे देणार आहोत. ‘बोले तैसा चाले त्याची वांदावी पाऊले’, असे आमचे सरकार आहे.

 

सिंहगड रोड पूल पुणेकरांना भेट

पुणेकरांना सिंहगड रोड उड्डाण पूल म्हणजे एक अपूर्व भेट आहे. यामुळे पुण्यात वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आम्ही पुणेकरांची वाहतूक कोंडीतून कशी सुटका करता येईल, यासंदर्भात सातत्याने विचार करत आहोत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगळे काय करता येईल, यावर आम्ही चर्चा करत असतो. सगळ्या संस्थांना एकत्र करून यावर चर्चा करून मार्ग काढत आहोत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *