आपण अनेक भाज्यांमध्ये किंवा काही विशेष पदार्थ बनवायचे असल्याच बटाट्याचा वापर करतो. अनेकांना बटाटे प्रचंड आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का, असे काही बटाटे आहेत ज्यामुळे प्राण देखील जाऊ शकतात. असे काही बटाटे जे विष देखील ठरु शकतात. आरोग्य प्रशिक्षक मनकीरत कौर सांगतात की फक्त विशिष्ट प्रकारचा बटाटा खाल्ल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल. पण सत्य असं देखील आहे की, काही पदार्थ आपण काहीही होणार नाही… याच विचारात खातो आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतात.
आरोग्य प्रशिक्षक मनकीरत कौर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मनकीरत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊ… आपण कायम मोठ्या प्रमाणात बटाट्यांचा साठा घरात करुन ठेवतो. ज्यामध्ये दोन प्रकारचे बटाटे असतात. एक म्हणजे असे बटाटे ज्यांवर हिरव्या रंगाचा डाग असतो आणि दुसरे म्हणजे ज्यांना अंकूर फुटलेलं असतं. तर चुकून देखील अशा दोन प्रकारचे बटाटे खाऊ नका. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, असे बटाटे विषारी असतात आणि आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.
का विषारी ठरतात असे बटाटे?
आरोग्य प्रशिक्षक म्हणतात की, हिरव्या बटाट्यांमध्ये आणि अंकुरलेल्या बटाट्यांमध्ये ‘सोलॅनिन’ नावाच्या विषाचे प्रमाण वाढते. हे सहसा बटाटे जास्त वेळ प्रकाशात राहिल्यास घडतं. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, असे बटाटे खाल्ल्याने उलट्या, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी, अनियमित हृदयाचे ठोके किंवा अनेक गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.
योग्य पद्धतीत करा बटाट्यांचा साठा
बटाटे निरोगी ठेवण्यासाठी, ते योग्यरित्या साठवणे महत्वाचे आहे. ते नेहमी थंड, कोरड्या आणि अंधार असलेल्या जागी ठेवा. त्यांना जास्त प्रकाशात ठेवू नका. तज्ज्ञ म्हणतात की बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. शिवाय कांदे आणि बटाट्यांना कधीच एकत्र ठेवू नका. जर तुमच्याकडे बटाट्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असेल तर तो सतत तपासत राहा आणि त्यातून कुजलेले आणि अंकुरलेले बटाटे काढून टाका.
सांगायचं झालं तर, Dr. Aditij Dhamija यांनी दिलेल्या माहितीनुसार, उलट्या, चक्कर आणि बेशुद्ध पडणं अशा गंभीर अवस्थेत एका 27 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा रक्तदाब इतका कमी झाला की त्याला ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. जेव्हा डॉक्टरांना याचं कारण कळलं तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले, कारण त्याचं कारण अंकुरलेले हिरवे बटाटे होते