नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नवी मुंबईतील (New Mumbai) उलवे (Ulwe) येथील जावळे गावात एका किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. तेथे उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दुकानात ठेवलेल्या तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे दुकानदाराची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांसह कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत दुकानाचा मालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास, घराला आणि किराणा स्टोअरला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली. याठिकाणी रमेश नावाचा दुकानदार जखमी झाला होता. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा या आगीमुळे मृत्यू झाला.

नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) यांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या, किराणा स्टोअरमध्ये तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे आढळून आले, त्यामुळे दुकान आणि निवासस्थानाला आग लागली. दोन छोटे 5 किलोचे सिलिंडर आणि 12 किलो वजनाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. जखमी रमेश यांच्यावर सध्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी सांगितले की, आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आग विझवली. जखमी व्यक्तीला स्थानिकांनी रुग्णालयात नेले. प्राथमिक कारण गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याचे दिसत असले तरी त्याची पुष्टी होणे बाकी आहे. आगीच्या दुर्घटनेतील पीडित कुटुंब हे मूळचे राजस्थानचे असून काही वर्षांपासून ते मुंबईत राहत होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *