लेखणी बुलंद टीम:
पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी दिवाळीच्या उत्सवादरम्यान फटाक्यांना लागलेल्या आगीत तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उलुबेरिया नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 27 मध्ये घडली जेव्हा मुले फटाके फोडत होते, तेव्हा ठिणगी शेजारी ठेवलेल्या काही फटाक्यांवर पडली, ज्यामुळे आग लागली आणि घरालाही आग लागली.
पोलीसअधिकारींनी सांगितले की, आगीत तीन मुले भाजली असून त्यांना उलुबेरिया मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अन्य दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या व आग आटोक्यात आणली.