लेखणी बुलंद टीम:
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी (Akshar Kothari) आता लग्नबंधनात अडकला आहे. आपल्या खास शैलीसाठी ओळखला जाणारा अक्षरने नुकतेच विवाह केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले असून, त्याने सोशल मीडियावरून लग्नाचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अक्षरने सारिका खासनिस हिच्याशी लग्न केले असून, त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही सांगितले की ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे. अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत “Then, Now and Always” असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने ‘बचपन का प्यार’ हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार ‘SaAkshar’ हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे. अक्षर कोठारी सध्या स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील त्याची अद्वैत ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
instagram.com/p/DLH-d5AzE4U