आजकाल कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्करोग वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात वापरत असलेल्या, आहारात घेतलेल्या अन्नामुळेही कर्करोग होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दिल्लीतील राजीव गांधी कर्करोग रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. विनीत तलवार यांनी याबाबत सविस्तर सांगितले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार रोजच्या वापरात असलेल्या प्लास्टिकच्या बॉटल, कंटेनर आरोग्यासाठी धोकादायक असतात.
आपण रोज खाण्यासाठी, पिण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटल्स, डब्बे सर्सार वापरले जातात. प्लास्टिकमध्ये असलेले केमिकल्स गरमी किंवा अन्य कारणांमुळे अन्नात मिसळून जातात. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
डॉ. तलवार यांच्या सांगण्यांनुसार अनेकजण चिप्स, बिस्किटे, नमकीन, इन्स्टंट नूडल्स, सॉस यासारखे पॅक्ड फूड खातात. अशा प्रकारच्या अन्नात प्रिझर्व्हेटिव्ह्ज, रंग,रसायने मिसळलेले असतात. त्यामुळे अशा पदार्थांचा दीर्घकाळ वापर केला तर ते धोकादायक ठरू शकते.
डिओड्रन्ट्स, केसांसाठी वापरण्यात येत असलेला शांपू, पर्फ्यूम, टॅल्कम पावडर अशा सौंदर्य प्रसाधनांत फॉर्म्याल्डिहाइड, पॅराबेन्स सारखी रसायने असू शकतात. त्यामुळेही कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)