प्रसिद्ध आसामी गायिका (Assamese Singer) गायत्री हजारिका (Gayatri Hazarika) यांचे शुक्रवारी वयाच्या 44 व्या वर्षी गुवाहाटी, आसाम येथील नेमकेअर रुग्णालयात निधन झाले. त्या कोलन कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे. ‘झोरा पाते पाते फागुन नामे’ या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. गायत्रीने ‘तुमी कुन बिरोही अनन्या’, ‘जंक नसील बोनोट’, ‘झेउजी झोपोन’ आणि इतर गाण्यांनाही आवाज दिला. अनेक प्रमुख व्यक्ती आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर गायत्री हजारिका यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसिद्ध गायिका गायत्री हजारिका यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. CMOfficeAssam च्या X हँडलवरील अधिकृत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘HCM डॉ. @himantabiswa यांनी प्रसिद्ध गायिका श्रीमती गायत्री हजारिका यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा भावपूर्ण आवाज आणि आसामी संगीतातील त्यांचे अतुल्य योगदान नेहमीच लक्षात राहील. HCM ने त्यांच्या चिरंतन शांतीसाठी प्रार्थना केली असून त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या.’