‘हा’ क्रिकेटर ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मधील मार्की प्लेअर सेटमधील 6 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ऋषभ पंत हा या सेटमधील आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

पहिल्या सेटमधील 6 खेळाडूंची किंमत आणि टीम

ऋषभ पंत : 27 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
श्रेयस अय्यर : 26 कोटी 75 लाख, पंजाब किंग्स
अर्शदीप सिंह : 18 कोटी, पंजाब किंग्स
जॉस बटलर : 15 कोटी 75 लाख, गुजरात
मिचेल स्टार्क : 11 कोटी 75 लाख, दिल्ली
कगिसो रबाडा : 10 कोटी 75 लाख, गुजरात

ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू, श्रेयसचा रेकॉर्ड ब्रेक
ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्येच श्रेयस अय्यर याचा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असण्याचा बहुमान हिसकावला आहे. श्रेयस अय्यर याला पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं. मात्र त्यानतंर लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी श्रेयसच्या तुलनेत 25 लाख रुपये जास्त मोजले आणि 27 कोटींमध्ये आपल्या गोटात घेतलं.

आयपीएल 17 व्या मोसमातील सर्वात महागडा ठरलेल्या मिचेल स्टार्कला यंदा झटका बसला आहे.. दिल्ली कॅपिट्ल्सने मिचेलला 11 कोटी 75 लाख रुपयांमध्ये आपल्या गोटात घेतंल आहे. त्यामुळे मिचेलला काही कोटींचं नुकसान झालं आहे. स्टार्कची बेस प्राईज ही 2 कोटी होती.

श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू
श्रेयस अय्यर याने इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपये मोजून त्याला पंजाब किंग्सने आपल्या गोटात घेतलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *