कॉन्सर्टदरम्यान ‘या’ सीईओचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झाल जगजाहीर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

एआय कंपनी ॲस्टॉनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांनी राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या काही दिवसांतच त्यांनी हे पाऊल उचललं आहे. ‘कोल्डप्ले’ कॉन्सर्टदरम्यान त्यांचा आणि कंपनीच्या एचआर क्रिस्टिन कॅबट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. बॉस्टनजवळ पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये अचानक त्यांच्यावर कॅमेरा फोकस करण्यात आला होता. त्यानंतर अँडी आणि क्रिस्टिन यांचं अफेअर अख्ख्या जगासमोर आलं होतं. या व्हिडीओमध्ये दोघं अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसले होते. ज्याक्षणी त्यांच्यावर कॅमेरा फोकस झाला, त्याक्षणी त्यांनी लगेच तोंड लपवण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

Coldplay हा जगविख्यात म्युझिक बँड आहे. त्यांच्या कॉन्सर्टदरम्यान अनेकदा प्रेक्षकांवर कॅमेरा फोकस करण्यात येतो. बॉस्टनजवळील कॉन्सर्टमध्ये जेव्हा अँडी आणि क्रिस्टिन एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. कॉन्सर्टमधल्या कॅमेऱ्याने त्यांना टिपलं होतं आणि दोघं अचानक मोठ्या स्क्रीनवर झळकले. त्यांनी त्यांनी लगेचच तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन म्हणाला, “एकतर या दोघांचं अफेअर असेल किंवा ते कॅमेरापासून खूप लाजतायत.”

अँडी आणि क्रिस्टिनचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. अखेर शनिवारी अँडी यांच्या कंपनीने एक निवेदन जारी करत त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. ‘आमच्या लीडरकडून चांगली वागणूक आणि जबाबदाऱ्या पार पडणं अपेक्षित आहे. अलीकडेच हे निकष पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे अँडी बायरन यांनी राजीनामा दिला आहे, जो संचालक मंडळाने स्वीकारला आहे’, असं कंपनीने स्पष्ट केलं. कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने बायरन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. त्यादरम्यान अंतरिमक सीईओंची नियुक्ती करण्यात आली होती.

किस कॅम म्हणजे काय?
मोठमोठ्या स्टेडियममधील एखाद्या कॉन्सर्ट किंवा स्पोर्ट्सदरम्यान हे किस कॅम पहायला मिळतात. ब्रेकदरम्यान हा कॅमेरा प्रेक्षकांमध्ये फिरवला जातो आणि त्यातील जोडप्यांची निवड केली जाते. स्टेडियममध्ये एखादं जोडपं दिसल्यास त्यांच्यावर हा कॅमेरा फोकस केला जातो आणि ते मोठ्या स्क्रीनवर दाखवलं जातं. त्यानंतर त्यांना सर्वांसमोर एकमेकांना किस करायला सांगितलं जातं.

अँडी यांचं स्पष्टीकरण
कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अँडी यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. ‘ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या निराशेची मी कबुली देतो. अत्यंत सार्वजनिक ठिकाणावरील संगीत आणि आनंदाची रात्र एका वैयक्तिक चुकीत रुपांतरित झाली होती. मी प्रामाणिकपणे माझी पत्नी, कुटुंब आणि ॲस्टॉनॉमरच्या टीमची माफी मागतो. एक जोडीदार, वडील आणि एक लीडर म्हणून तुम्हाला माझ्याकडून चांगली वागणूक मिळायला पाहिजे होती. मला असं बनायचं नाहीये आणि ज्या कंपनीला उभारायला मी मदत केली, त्याचं प्रतिनिधित्व अशा पद्धतीने करायचं नाहीये. मी आत्मपरिक्षण करण्यासाठी, गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी आणि पुढील पावलांबद्दल निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ घेत आहे’, असं त्यांनी म्हटलं होतं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *