लाडक्या बहिणींना सुरक्षित करण्यासाठी हे अ‍ॅप तयार,कसा कराल वापर?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुती सरकारने (Mahayuti Government) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. सरकारच्या माध्यमातून या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेत 2 कोटीहून अधिक महिलांना समाविष्ट करण्यात आले आहे. महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरघोस मतदान केले आहे. आता लाडक्या बहिणींना सुरक्षित करण्यासाठी अहिल्यानगर (Ahilyanagar News) येथील माजी नगरसेवक निखिल वारे (Nikhil Ware) यांनी एक मोबाईल ॲप (Mobile Application) डेव्हलप केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून शिक्षणासाठी नगर शहरात येणाऱ्या विद्यार्थिनी शहरातील महिला आणि जेष्ठ नागरिक यांना संकटाच्या काळात आपल्या जवळच्या चार व्यक्तींना मदत मागता येणार आहे. निडली एस ओ एस नावाचे हे ॲप्लिकेशन शहरातील सावेडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मोबाईल ॲपची सध्या अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

कसे काम करते निडली एस ओ एस?
महिला किंवा युवतींना असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईलमध्ये असलेल्या निडली एस ओ एस या ॲप्लिकेशन वापर करून जवळच्या चार नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठविला जातो. त्याचप्रमाणे महिला किंवा युवतींचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकापर्यंत पाठविता येते. लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास या मोबाईल ॲपच्या माध्यमातून मदत होते.

मोबाईलमध्ये वाजणार सायरन
संकटाच्या काळात मोबाईल हाताळता आला नाही तर केवळ व्हॅल्यूम बटन हे तीन ते चार वेळेला दाबले तरीदेखील जवळच्या व्यक्तींना मेसेज जाणार आहे. सोबतच मोबाईलमध्ये सायरन देखील वाजणार आहे. या पद्धतीचं ॲप तयार करण्यात आले आहे. राज्यात हे ॲप पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यात वापरले जाणार असल्याचा दावा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *