पुण्यातील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ वर्षांच्या मुलाला 50 हजारात विकण्यासाठी मुलाच्या परिचित व्यक्तींना त्याचा अपहरण केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुलाचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्याला चिंचवड वरून थेट चाळीसगावला अपहरण करून येणाऱ्या आरोपीला चिंचवड पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने पकडला आहे. पोलिसांनी आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.
गजानन पानपाटील असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुलाच्या आईला तिच्या आठ वर्षाचा मुलगा 50 हजार रुपयांना विकण्यास आरोपीने सांगितले होते. मात्र मुलाच्या आईने त्यास नकार दिल्याने त्याने मुलाचे अपहरण केले. या आरोपीचे अपहरण करणाऱ्या डोळ्यांशी कुठला संबंध आहे का? याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
नक्की झाले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गजानन पानपाटील हा चार दिवसांपूर्वी चिंचवड येथे आला होता. पीडित कुटुंबाच्या घरी तो वारंवार यायचा. त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणि बिस्किटांचे अमिषा दाखवत असे. त्यामुळे मुलगाही आरोपीकडे रमायचा. मात्र एके दिवशी मुलाच्या आईला आरोपीने तिचा आठ वर्षांचा मुलगा पन्नास हजार रुपयांना विकण्यास सांगितले. मात्र महिलेने आरोपी स्पष्ट नकार दिला. 31 मार्च रोजी पती-पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपी गजानन पान पाटील याने मुलाला उचललं आणि थेट चाळीसगावला घेऊन गेला. घरी आल्यानंतर मुलगा दिसला नाही त्यामुळे मुलाच्या आई-वडिलांना संशय आला . त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासात आरोपीचा माग काढला. त्यानंतर आरोपी मुलाला घेऊन चाळीसगावला गेल्याचे कळले. चिंचवड पोलिसांनी भुसावळ पोलीस रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि चाळीसगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधात अपहरण करता गजानन आणि महिलेच्या मुलाचे सीसीटीव्ही कुठेच पाठवले. अखेर आरोपीला चाळीसगाव मध्ये रेल्वे मधून ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने आरोपीला पिंपरी चिंचवड ला आणण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर लक्षात आले की त्याला स्वतःची दोन मुले आहेत मग तो अपहरण केलेल्या मुलाला कोणाच स्वाधीन करणार होता किंवा त्याला कोणाला आठ वर्षांच्या मुलाला विकायचे होते याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.