‘या’ काही खास योगासनांमुळे मधुमेहाचा धोका तब्बल 40 टक्क्यांपर्यंत होईल कमी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

योगाचं महत्त्व आता फक्त प्राचीन ज्ञान म्हणून मर्यादित राहिलेलं नाही, तर आधुनिक विज्ञानानेही त्याला मान्यता दिली आहे. नुकत्याच भारतात झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालंय की, नियमित योगासनांनी टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

डॉक्टर म्हणतात मधुमेह पूर्णपणे बरा करण्यासाठी अजून कोणतंच औषध उपलब्ध नाही, पण या संशोधनाने योग एक प्रभावी उपाय असल्याचं सिद्ध केलं आहे. चला, तर मग जाणून घेऊया ही 10 योगासने आणि प्राणायाम कोणते आहेत, जे मधुमेहापासून तुमचं संरक्षण करू शकतात.

मधुमेहासाठी 10 प्रभावी योगासने

हे योगासन नियमित केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छाही होणार नाही:

1. सुखासन आणि ॐ चा जप: योगासनांची सुरुवात शांतपणे सुखासनात बसून ॐ चा जप करण्याने करा. यामुळे मन शांत होते.

2. त्रिकोणासन: या आसनात पाय थोडे दूर ठेवून, एका हाताने पायाला स्पर्श करायचा असतो आणि दुसरा हात सरळ वरच्या दिशेने असतो.

3. कटि चक्रासन: सरळ उभे राहून, हात पुढे करून, कमरेला डावीकडे आणि उजवीकडे वळवा. हे आसन मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे.

4. सूर्य नमस्कार: हा केवळ एक आसन नाही, तर 12 आसनांचा समूह आहे. दररोज फक्त सूर्य नमस्कार केल्यास 12 योगासनांचे फायदे मिळतात.

5. अर्ध मत्स्येन्द्रासन: हे बसून करायचे आसन आहे. यात शरीराला अर्ध्या माशासारखा आकार दिला जातो.

6. पवनमुक्तासन: हे आसन पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

7. भुजंगासन: पोटावर झोपून शरीराचा पुढचा भाग सापाच्या आकृतीसारखा वर उचलायचा असतो.

8. धनुरासन: यात शरीराला धनुष्याचा आकार दिला जातो.

9. प्राणायाम: यात ‘भस्त्रिका’ आणि ‘रेचकम्’ प्राणायामाचा समावेश आहे, जे फुफ्फुसांसाठी आणि श्वासाच्या क्रियेसाठी खूप महत्त्वाचे आहेत.

10. शवासन: सर्व आसने झाल्यावर शेवटी शवासन करा. यात मृतदेहासारखे शांत आणि स्थिर झोपून पूर्ण शरीराला आराम दिला जातो.

या संशोधनामुळे आता योगाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. जर तुम्ही रोज ही योगासने नियमितपणे केलीत, तर तुम्ही मधुमेहासारख्या गंभीर आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *