बाईकर्स, हे सहा इमर्जन्सी इंडिकेटर्स देतील तुम्हाला बाईकमधील समस्येची माहिती,वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बाईकर्स अनेकदा त्यांच्या इमर्जन्सी इंडिकेटर्सकडे दुर्लक्ष करतात. जशी वेळोवेळी तुम्ही बाईकच्या इतर गोष्टींची काळजी घेता, तशीच बाईक चालवताना इमर्जन्सी इंडिकेटर्सची माहिती घेणंही खूप गरजेचं आहे. कारण- ही संकेत तुम्हाला बाईकमधील समस्येची माहिती देतात. जर हे संकेत स्पीडोमीटरवर ब्लिंक करीत असतील, तर तुम्ही ताबडतोब सावध होणे गरजेचे आहे.

तुमच्या माहितीसाठी काही मुख्य आपत्कालीन निर्देशक खाली दिले आहेत:
इंजिन वॉर्निंग लाइट (Engine Warning Light) : बाईकच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यास हा इंडिकेटर ब्लिंक होतो. जर हा इंडिकेटर सतत ब्लिंक होत असेल, तर दुचाकी ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये नेली पाहिजे.

ऑईल प्रेशर वॉर्निंग (Oil Pressure Warning) : हा सिग्नल इंजिनमध्ये ऑईलचे प्रमाण कमी असल्याचे किंवा प्रेशर योग्य नसल्याचे सूचित करतो. अशा परिस्थितीत तुम्ही बाईक थांबवून लगेच ऑईल चेक केले पाहिजे.

टेम्परेचर वॉर्निंग लाइट (Temperature Warning Light) : जेव्हा इंजिनचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढते तेव्हा ही लाईट ब्लिंक होते. तापमान वाढल्याने इंजिन जास्त गरम होऊ शकते, त्यामुळे बाईक थंड होऊ द्या आणि नंतर ती वापरा.

बॅटरी वॉर्निंग लाइट (Battery Warning Light) : हा संकेत बॅटरी चार्जिंगशी संबंधित समस्या सूचित करतो. जर बॅटरी चार्ज होत नसेल, तर तुमची बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये नेणे आवश्यक आहे.

टायर प्रेशर वॉर्निंग (Tire Pressure Warning) : टायर प्रेशर वॉर्निंग हे फीचर काही नवीन बाइक्समध्ये उपलब्ध आहे, जे टायरमधील हवेच्या दाबावर लक्ष ठेवते. जर दाब कमी असेल, तर हा निर्देशक ब्लिंक करतो.

ब्रेक वॉर्निंग लाइट (Brake Warning Light) : ही वॉर्निंग लाइट म्हणजे ब्रेक सिस्टीममधील बिघाड झाल्याचा संकेत आहे. अशा परिस्थितीत बाईक चालवणे सुरक्षित नसून, त्याची त्वरित सर्व्हिसिंग करावी.

दुचाकी चालकांनी या आपत्कालीन संकेतांकडे (Bike emergency indicators) योग्य वेळी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण- आपल्या सुरक्षिततेसाठी ते खूप गरजेचे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *