पावसाळा सुरु झाला की सगळीकडे हिरवंगार निसर्ग पाहायला मिळत. डोंगर दऱ्या हिरव्यागार होऊन जात. या दिवसांमध्ये अनेकजण ट्रेकिंग किंवा इतर ठिकाणी फिरायला जातात. अशातच तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि निसर्गाचे सौंदर्य जवळून पहायला आवडत असेल तर पावसाळा यासाठी सर्वोत्तम आहे. यावेळी सर्वत्र हिरवळ दिसते. पण या ऋतूत प्रवास करण्यापूर्वी काही खास तयारी करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये. तसेच पावसाळ्यात हिरवाईने भरलेले डोंगर, तळे पाहणे म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग पाहण्यासारखा आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच वाढते आणि म्हणूनच पावसाळ्यात काही विशिष्ट ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो.
योग्य ठिकाण निवडणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात दक्षिण भारतातील मैदानी किंवा हिल स्टेशनवर जाणे सुरक्षित आहे. सुरक्षितता लक्षात घेऊन तुम्ही या ठिकाणं एक्सप्लोर करू शकता:
लोणावळा आणि खंडाळा: तुम्ही जर मुंबईत राहात असाल तर पावसाळ्यात लोक ट्रेकिंगचा खूप आनंद घेतात. पावसाळ्यात लोणावळा आणि खंडाळा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील टेकड्या हिरव्या होतात, धबधबे वाहू लागतात आणि वातावरणात एक वेगळीच ताजेपणा जाणवतो. येथे अनेक किल्ले आणि गुहा आहेत जिथे हायकिंग करून पोहोचता येते.
कूर्ग: कर्नाटकातील प्रसिद्ध हिल स्टेशन कूर्ग पावसाळ्यात खूप सुंदर दिसते. पावसाळ्यात येथील वातावरण आल्हाददायक असते. या दिवसांमध्ये तुम्ही कॉफीच्या बागांना भेट देऊ शकता.
मुन्नार: केरळमधील मुन्नार हे हनिमून डेस्टिनेशन असले तरी पावसाळ्यात हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी दिसत नाही. या हंगामात येथे एक वेगळेच दृश्य पाहता येते. येथे तुम्ही पर्वतांचा तसेच चहाच्या बागांचा आनंद घेऊ शकता. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता.
लडाख: पावसाळ्यात संपूर्ण भारतात पाऊस पडतो, परंतु लडाख मध्ये पाऊस पडत नाही. तर लडाख येथे मान्सून शेवटच्या टप्प्यात पोहोचतो पण परतीचा पाऊस असल्याने जास्त पाऊस पडत नाही. या हंगामात, तुम्ही या ठिकाणाच्या सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
पावसाळ्सात फिरायला जाताना वॉटरप्रूफ वस्तू पॅक करा.
पावसाळ्यात कधीही पाऊस पडू शकतो, म्हणून तुम्ही जे काही सामान पॅक कराल ते वॉटरप्रूफ असले पाहिजे. बाजारात अशा अनेक बॅगा आणि सुटकेस आहेत ज्या पाण्यामुळे खराब होत नाहीत. तसेच वॉटरप्रूफ रेनकोट, जॅकेट आणि शूज पॅक करा. छत्री ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. मोबाईल ठेवण्यासाठी प्लास्टिक कव्हर किंवा वॉटरप्रूफ कव्हरचा वापर करा. पावसापासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल त्यात ठेवू शकता.
अतिरिक्त कपडे आणि औषधे ठेवा
या ऋतूत नेहमी हलके आणि लवकर कोरडे होणारे कपडे पॅक करा. नेहमी एक अतिरिक्त कपडे सोबत घ्या. तसेच सर्दी, ताप आणि उलट्यांसंबंधी औषधे जवळ ठेवा. टॉवेल आणि टिश्यू पेपर देखील पॅक करा.