लेखणी बुलंद टीम:
१. तुळशीची पाने चघळा: तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ताजी तुळशीची ४-५ पाने दररोज सकाळी चघळल्याने तोंडातील बॅक्टेरिया मरतात आणि तोंडातील वास कमी होतो.
२. लवंग चघळा: लवंग ही एक नैसर्गिक डिऑडरंटसारखी काम करते. लवंग चघळल्याने तोंडातील दुर्गंध नष्ट होतो आणि ताजेपणा जाणवतो. कामावर जाताना किंवा जेवणानंतर लवंग चघळणं फायदेशीर ठरतं.
३. पाणी भरपूर प्या: तोंड कोरडं राहिलं की वास येतो. त्यामुळे दररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. पाण्यामुळे तोंडातील अन्नकण, बॅक्टेरिया साफ होतात.
४. दालचिनीचा वापर करा: दालचिनीमध्ये अँटीसेप्टिक घटक असतात. १ कप पाण्यात १ तुकडा दालचिनी उकळा, गार झाल्यावर गुळण्या करा. यामुळे तोंडातील वास दूर होतो आणि तोंड स्वच्छ राहतो.
५. कोथिंबिरीचा रस: थोडीशी ताजी कोथिंबीर वाटून त्याचा रस काढा. तो रस पाण्यात मिसळून गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. हे नैसर्गिक माउथवॉशसारखं काम करतं.त्याचप्रमाणे दिवसातून दोनदा नियमित ब्रश करा.तुमची जीभ दाताप्रमाणेच स्वच्छ ठेवा.डेंटल फ्लॉस वापरून दातात अडकलेले अन्नकण काढा.नियमित डेंटिस्टकडून दातांची तपासणी करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. लेखणी बुलंद टीम यातून कोणताही दावा करत नाही. )