बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आजकाल कोलेस्ट्रॉल वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. उच्च कोलेस्ट्रॉल पातळी केवळ हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देऊ शकते, तर इतर अनेक आरोग्य समस्यांचे कारणही ठरू शकते. अशा वेळी वेळीच यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. येथे अशा 5 नैसर्गिक खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे, जे तुमच्या कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.
अॅव्होकॅडो: अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मुबलक प्रमाणात असतात, जे LDL (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करून HDL (चांगले) कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. याचे सेवन उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्स LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात, परंतु याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.
फळे: सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरी आणि संत्री यासारख्या फळांमध्ये विद्राव्य फायबर जास्त प्रमाणात असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते.
नट्स: दररोज एक मूठभर नट्स जसे की बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांचा आहारात समावेश करा. यामधील निरोगी फॅट्स हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.
सोया प्रोडक्ट्स: टोफू, सोया दूध यासारख्या सोया उत्पादनांमध्ये उच्च प्रथिने असतात. यांचे सेवन LDL कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)