‘या’ ४ दिवसांमध्ये समुद्राला मोठी भरती येणार, भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

येत्या 24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहेत. त्यामुळं नागरिकांनी भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे. त्याचबरोबर समुद्राच्या भरतीच्या संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार
गुरुवार, दिनांक 24 जुलै 2025 ते रविवार ते दिनांक 27 जुलै 2025 या कालावधीदरम्यान सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, दिनांक 26 जुलै 2025 रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे.

जुलै 2025 महिन्यातील भरतीसंदर्भात माहिती
गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजून 57 मिनीटांनी जोरदार लाट उसळणार आहेत. लाटांची उंची ही साधारणत: 4.57 मीटर असणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी दुपारी 12.40 वाजता लाटांची उंची ही 4.66 मीटर असणार आहे. शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी दुपारी 1.20 वाजता लाटांची उंची 4.67 मीटर असणार आहे. तर रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 1.56 वाजता लाटांची उंची 4.60 मीटर असणार आहे.

दरम्यान, समुद्राच्या भरती दरम्यान, पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी गर्दी करतात. मात्र, अशा वेळी अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं महत्वाचं आहे. या काळात पोलिस प्रशासन देखील त्या परिसरात तैनात करण्यात येते. मात्र, काही पर्यटक सूचना देऊनसुद्धा समुद्रकिनारी जातात. त्यामुळं मुंबई महानगपपालिकेनं काही सूचना जारी केल्या आहेत. या काळात कोणत्याही नागरिकाने समुद्रकिनारी जाऊ नयेस योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात समुद्र खवळलेला असतो
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 महिन्यात समुद्र खवळलेला असतो. इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशन मधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्रातील पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी शिष्टमंडळाने मंत्री राणेंकडे केली आहे. गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट केल्याने शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी, पावसाळी मासेमारी बंदी 15 ऑगस्ट पर्यंत करण्याचा जोर सर्व पारंपारिक मच्छीमारांनी धरला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *