सध्या जगातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन देखील तरुणांना नोकरी मिळत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? की कोणत्या देशात सर्वाधिक नोकरीच्या संधी आहेत. तुम्हाला असे वाटत असेल की कॅनडा, अमेरिका किंवा ब्रिटनसारख्या देशांमध्ये नोकरीच्या संधी जास्त आहेत. परंतू, त्या सर्वांना मागे टाकून, संयुक्त अरब अमिराती (UAE) पहिल्या क्रमांकावर आहे. 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत भरतीच्या बाबतीत ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक (NEO) +48 टक्के आहे, जो जागतिक सरासरी +24 टक्के पेक्षा खूपच जास्त आहे.
हे UAE चे टॉप हायरिंग सेक्टर
NEO हा एक सर्वेक्षण आधारित आकडा आहे, जो भरतीबाबत नियोक्त्यांचे हेतू काय आहेत हे दर्शवितो. यावरुन कामगार बाजारातील ट्रेंड आणि बाजारात किती नोकरीच्या संधी आहेत याची कल्पना येते. संयुक्त अरब अमिरातीमधील 56 टक्के नियोक्ते त्यांच्या कामगारांच्या व्याप्तीचा विस्तार करण्याची आशा करतात. फक्त 8 टक्के असे आहेत ज्यांना कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता दिसते. येथील टॉप हायरिंग सेक्टरमध्ये वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि ऑटोमोटिव्ह (+64 टक्के), ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा (+60 टक्के), ऊर्जा आणि उपयुक्तता (+62 टक्के) यांचा समावेश आहे. हे सर्व जागतिक मानकांपेक्षा खूपच जास्त आहेत.
भरतीच्या बाबतीत युएई अव्वल
वाढत्या महागाईसह विविध भत्ते, कामगिरी बोनस, कामासाठी हायब्रिड किंवा रिमोट पर्याय इत्यादी अनेक सुविधा देत आहेत. हे लक्षात घेता, जागतिक नोकरी बाजारात 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत नोकरी शोधणाऱ्यांसाठी युएई जगातील सर्वात आशादायक ठिकाण म्हणून उदयास आले आहे. मॅनपॉवर ग्रुपच्या अलीकडील रोजगार आऊटलुक सर्वेक्षणानुसार, युएईने +48 टक्के विक्रमी नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक (NEO) नोंदवला आहे. यामुळे जगभरात भरतीच्या बाबतीत तो अव्वल क्रमांकाचा देश बनला आहे. निम्म्याहून अधिक नियोक्ते त्यांचे कर्मचारी वाढवण्याची योजना आखत आहेत, विशेषतः लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रात. व्यावसायिक वाढ, प्रतिभेचे आकर्षण आणि आर्थिक लवचिकता यामुळे युएई स्वतःला एक केंद्र म्हणून स्थापित करण्यात यशस्वी झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील 56 टक्के नियोक्ते त्यांच्या कामगारांच्या व्याप्तीचा विस्तार करण्याची आशा करतात. फक्त 8 टक्के असे आहेत ज्यांना कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता दिसते.