लेखणी बुलंद टीम:
पश्चिम बंगालमधील कोलकाता रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घृणास्पद घटनेतील आरोपींची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कोलकाता येथील एमजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग करून तिची हत्या करण्यात आली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, विनयभंग आणि हत्येचा आरोपी संजय रॉयची मानसिक चाचणी केल्यानंतर आता त्याची पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे.