सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये काही दिवसांपूर्वी काही महत्वाचे बदल करण्यात आले होते. डोळ्यांवर काली पट्टी ,एक हातात तराजू असलेल्या या मूर्तीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात आले.
मात्र या बदलांना आता वकिलांच्या संघटनेकडून विरोध केला जात आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्याला सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन या सुप्रीम कोर्टातील वकिलांच्या संघटनेने विरोध दर्शवला आहे. या संघटनेने एक ठराव पारित केला असून त्यात न्यायदेवता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चिन्हात बदल करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन सल्ला घेतला गेला नसल्याचे मत मांडले आहे. जेष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.