लेखणी बुलंद टीम:
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकिसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या पूर्वी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर करत 83 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित केले होते. आज सहावी यादी जाहीर करत वंचितने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत 128 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहेत.
आदिवासी, कुणबी, कोळी, कोळी महादेव, ख्रिश्चन, गोंड गवारी, तडवी, धनगर, धिवर, पारधी, फकीर, बंजारा, बौद्ध, भिल्ल, मराठा, मांग, माना, माळी, मुस्लिम, मुस्लिम-पिंजारी, राजपुत, लिंगायत, लेवा पाटील, लोहार, वंजारी, वडार, कोकणा, धोबी, साळी या जातींसह उत्तर भारतीय उमेदवाराला देखील वंचितने उमेदवारी दिली आहे.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे. आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा याच मुद्द्यावर लढवली जाणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने एससी, एसटी आणि ओबीसी या समाज घटकांची मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीतील कमतरता भरून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विधानसभेत कमबॅक करणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सुप्रीम कोर्टाने आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमीलेयर संदर्भात दिलेल्या निकालावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना धारेवर धरल्याचे दिसत आहे. काँग्रेस म्हणजेच भाजप या त्यांच्या मांडणीचा आगामी विधानसभा निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार असे चित्र आहे. लोकसभेत काँग्रेसला दलित, आदिवासी यांची मते मोठ्या प्रमाणात मिळाली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने ही मते काँग्रेसपासून दूर जात वंचित बहुजन आघाडीकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहा वंचित बहुजन आघाडीची सहावी उमेदवार यादी :