सोन्याच्या भावाने 81 हजार रुपयांचा आकडा केला पार,तर चांदी तब्बल…

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात लोक आवडीने दागिने खरेदी करतात. असे असताना सोने चांदीचा दर गगनाना भिडताना दिसतोय. दरम्यान, आज (23 ऑक्टोबर) पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा दर थेट एक लाखाच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावानेदेखील 81 हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.

चांदीचा दर एक लाखाच्या पुढे
सोने आणि चांदीचा दर आपल्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. ताज्या माहितीनुसार चांदीचा भाव 1500 रुपयांच्या वाढीसह थेट एक लाख रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ही सलग पाचवी दरवाढ आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 99,500 रुपये प्रति किलोग्रॅम होता. त्यानंतर आता सलग पाचव्या दिवश चांदीचा दर वाढला असून तो 1.01 लाख रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

सोन्याचा भाव किती?
सोन्याच्या भावातही सध्या वाढ झाली आहे. 99.5 फीसदी शुद्रतेचं सोनं 350 रुपयांनी वाढून 80,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मंगळवारी 350 रुपयांच्या तेजीसह 81,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

सोने आणि चांदीच्या दरात वाढ का होत आहे?
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे या काळात भारतभरात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळेही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *