‘यापूर्वीचे सरकार बाबासाहेबांना विसरले होते. खऱ्या रत्नाला ..’; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बाबासाहेबांना आम्ही विसरलो होतो. यापूर्वीचे सरकार बाबासाहेबांना विसरले होते. खऱ्या रत्नाला भारत रत्न देण्यास उशीर झाला. परंतु अखेर तो दिवस आला. १९९० मध्ये बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबडेकर यांना भारत रत्न दिला गेला. ज्यांनी भारताच्या संविधानची निर्मिती केली, त्यांना उशिराने भारत रत्न दिला गेला, असे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. भारताचे महामहीम राष्ट्रपती कुठल्या समाजातील आहेत. पंतप्रधान कुठल्या जातीचे आहेत. उपराष्ट्रपती कोण आहे. हा बाबासाहेबांचा विचार आहे, असे त्यांनी म्हटले.

मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी शिक्षण घेतले. या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय म्हणजे एक प्रकारचा हवन आहे. आपण एखाद्या मंदिरात करतो, तसा हा हवन आहे. बाबासाहेबांनी वंचितांना न्याय दिला. पण विचार करा, याआधी त्यांना भारतरत्न का दिला नाही. त्यांनी संविधानाची निर्मिती केली. त्यांना उशिराने भारत रत्न दिला गेला, असे उपराष्ट्रपींनी म्हटले आहे.

मंडल कमिशनचा अहवाल कोणी लपवला?
मंडल कमिशनचा अहवाल सादर केल्यानंतर तो का दडपून ठेवला? गांधी घराण्यातील पंतप्रधान असताना एक पान हलले नाही. मी केंद्रात मंत्री असताना मला हा अहवाल मंजुरी करण्याची संधी मिळाली. माझे भाग्य होते. आरक्षणाचा मुद्दा याआधी निकाली का लागला नाही, असे जगदीप धनखड यांनी म्हटले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *