लेखणी बुलंद टीम:
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सकाळी 07:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत मतदान होईल.
20 नोव्हेंबरला मतदान होणार असून विशेषत: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 10117 मतदान केंद्रांवर 10229708 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07:00 ते संध्याकाळी 06:00 पर्यंत होईल. यानिमित्ताने मतदारांना पुरेशा सुविधा देऊन मतदान सुरळीत पार पाडण्याचे आव्हान निवडणूक आयोगाला पेलावे लागणार आहे.