पुण्यात ‘जीबीएस’च्या बळींची संख्या 7 वर, जाणून घ्या इतर भागांमधील माहिती

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या 8 नवीन रुग्णांची काल (सोमवारी, ता-10) नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 192 वरती पोहोचली आहे. जीबीएसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृत रुग्णांची संख्या 7 वरती पोहोचली आहे. त्यापैकी 6 मृत्यू पुणे जिल्ह्यातील आणि 1 मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील आहे. जीबीएसमधून बरे झालेल्या 91 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 192 रुग्णांपैकी 91 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, 39 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 25 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत.

सध्या 48 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे मनपा आणि जिल्ह्यातील वाधित भागांमध्ये सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. बिबवेवाडीत राहणाऱ्या एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाहनचालक होता, 31 जानेवारीपासून या रुगाणाला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. सांगली येथे उपचार घेऊन नीट झालेल्या रुगाणाला पुन्हा त्रास सुरु झाल्याने पुन्हा एकदा पुण्यातील कमला नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.

आधी सांगलीत उपचार मग पुण्यात केलं दाखल
बिबवेवाडी येथील 37 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. वाहनचालक असलेल्या या रुग्णाला 31 जानेवारीपासून त्रास सुरू झाला होता. त्याला भारती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेल्यानंतर त्याचा एमआरआय करण्यात आला. नातेवाइकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी रूग्णाला नातेवाइकांनी निपाणी येथे नेलं. रुग्णाचा त्रास वाढल्याने त्याला सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याची नर्व्ह कंडक्शन तपासणी करून जीबीएसचे उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच 5 फेब्रुवारी रोजी नातेवाइकांनी वैद्यकीय सल्ल्याविरुध्द डिस्चार्ज घेतला. त्याच दिवशी त्याला पुन्हा पुण्यात आणून संध्याकाळी कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. फेब्रुवारी रोजी रुग्णाला कार्डिअ‍ॅक अरेस्टचा त्रास झाला. त्याला 30 मिनिटे सीपीआर देण्यात आला. उपचारादरम्यान रात्री 10 वाजता रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती मृत्यू अहवालात देण्यात आली आहे.

जीबीएस रोखण्यासाठी पाण्याची जैविक चाचणी करणं बंधनकारक
गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची रासायनिक आणि जैविक चाचणी अभियान स्वरूपात पार पाडण्यासंबंधीचे निर्देश राज्य सरकारकडून सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. या चाचण्या पूर्ण करत स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होईल, याची व्यवस्था करावी. यात कुचराई केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *