स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट करून मानले आभार… कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द! वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश!
शिंदे – भाजप सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने करून हा निर्णय रद्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती.
वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरात सातत्याने केलेले आंदोलने, पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेत या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवला होता व सरकारला इशारा दिला होता की, वंचित-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कदापि खेळू देणार नाही.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या निर्णयाविरोधात राज्यभर प्रभावी आंदोलने करत या निर्णयाविरोधात रान उठवले होते. अखेर सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला.
जोपर्यंत राज्य सरकार सगळ्या रिक्त जागा भरत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची ही लढाई सुरू राहील.