महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात एक थरारक घटना घडली आहे. चूकून बंदूकीतून गोळी (Firing) झाडल्याने 18 वर्षाचा तरुण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती रविवारी पोलिसांनी माध्यमांना दिली. पोलिसांनी सांगितले की, भावाने बंदूकीतून चूकून गोळी झाडली ज्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ठाण्यातील मुंब्रा महापे येथील पेट्रोल पंपावर हा थरारक घडला. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले तर आरोपी भावाला अटक केले आहे. गोळीबारच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भावाने बेयादेशीरपणे बंदूक हाताळली. आरोपीवर बेकायदेशीरपणे बंदूक हाताळणे आणि गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने विना परवाणा बंदूक हाताळले त्यावेळीस अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेत त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या भावाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सद्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.
प्राथमिक तपासात आरोपीचा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मोबाईल स्नॅचिंग सिंडिकेटशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.