बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला 5 दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांनी असेही म्हटले आहे की, हा आंतरराष्ट्रीय कट आहे की नाही याचा तपास करायचा आहे. अभिनेत्यावर 17 जानेवारी रोजी पहाटे 2:00 वाजता त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला करण्यात आला. नंतर त्याला पहाटे 3:00 वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान, सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा काढण्यात आला होता. डॉक्टरांनी सांगितले की, अभिनेता आता धोक्याबाहेर आहे.