लेखणी बुलंद टीम:
‘सनम तेरी कसम’ या भारतीय चित्रपटात काम करणारी प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिनं लग्न केलं आहे. अभिनेत्रीनं तिच्या लग्नाचे पहिले फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
मावरा होकेनचं लग्न 5 फेब्रुवारी 2025 रोजी झालं. तिच्या लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीनं लिहिलं की, “और सारी उथल-पुथल के बीच, मैंने तुम्हें ढूंढ लिया. बिस्मिल्लाह.”
पोस्टमध्ये, मावरानं तिच्या नावासोबत तिच्या पतीचं नाव जोडून हॅशटॅग वापरला आहे. तिनं लिहिलं आहे की, “हॅशटॅग मावरा अमीर हो गई”
पाकिस्तानी सौंदर्यवतीनं तिच्या लग्नासाठी हिरव्या रंगाचा लेहेंगा निवडला होता. तिनं या लेहेंग्यासोबत एक नेटेड दुप्पट्टा मॅच केला होता.
ही अभिनेत्री मॅचिंग हेव्ही ज्वेलरी, कानात झुमके, कपाळावर टीका आणि झुमर यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. या काळात तिनं अगदी मिनिमम मेकअप केला होता.
मावरानं तिच्या हातांवर सुंदर आणि हेव्ही मेहंदी डिझाइन काढली होती. त्या फोटोंमध्ये ती तिच्या लग्नाची अंगठीही फ्लॉन्ट करताना दिसली.
तर तिचा नवरा अमीर गिलानीनं काळा कुर्ता पायजमा निवडला. यासोबत, त्यानं एक मॅच होणारा स्टोल कॅरी केला होता.
मावरानं तिच्या लग्नात क्लासी फोटोशूट केलं. यावेळी, ती आणि आमिर एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसले.
एका फोटोमध्ये आमिरनं त्याच्या बायकोला घट्ट मिठी मारली आहे. आता चाहते या जोडप्याला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी अभिनंदन करत आहेत.