लेखणी बुलंद टीम :
मराठा आंदोलनासाठी बसलेल्या जरांगे यांच्या समर्थकांना उपोषणस्थळी जाताना वडीगोद्री येथे अडवण्यात आल्याने मोठा राडा झाला. जरांगे यांनी थेट मंत्र्यांना फोन केल्याचं समजल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं, या प्रकरणावर बोलताना जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. जरांगे यांच्या समर्थकांना अंतरवलीकडे उपोषणस्थळी जात असताना वडीगोद्री येथे अडवण्यात आलं. त्यावेळी मराठा समन्वयक आण ओबीसी आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. जरांगेंनी थेट मंत्र्यांना फोन फिरवल्याचं समजताच तिथले बॅरिकेटिंग हटवण्यात आलं. या प्रकरणावर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांचा मोठा डाव असून त्यांना दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला.
आमचे आणि धनगरांचे वैर नाही आणि ते पिढ्यान पार नाही. लक्ष्मण हाके कोण आलाय भांडण विकत घेणारा, स्वतःला काय जहागीरदार समजतो का? छगन भुजबळ हरामखोर म्हातारपणी गु चिवडायला लागला आहे. म्हातारपनी का डाग लावून घेत आहे. तो हरामखोर भुजबळ इकडे दंगली भडकवून देत आहे. फडणवीसचं एकूण कशाला दंगली लावतो रे. इथे काही झाले तर याला जबाबदार फक्त छगन भुजबळ आणि फडवणीस राहतील, अशा एकेरी शब्दात बोलत मनोज जरांगे यांनी थेट छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
आम्ही बसलो की हे आंदोलनाला बसतात, आम्ही नसल्यावर त्यांनी आंदोलन करावे. यांच्या ढुंगणाला काय साप चावतो का? आम्ही आलो की हे कसे काय येऊन बसतात. कशामुळे मराठ्यांचे आणि धनगरांची भांडणे लावायचे आहे. धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्ही काय मस्ती लावली का? हे गरीब धनगरांना हे सर्व माहित असल्याचं जरांगे म्हणाले.