होळी पार्टीमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्रीचा कलाकाराकडून विनयभंग

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुंबई मध्ये एका चॅनेल कडून आयोजित होळी पार्टीमध्ये (Holi Party) टेलिव्हिजन अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम उपनगरात आयोजित पार्टीमध्ये सहकलाकाराने अभिनेत्रीसोबत अनुचित प्रकार केला, तिला चूकीच्या पद्धतीने हात लावला असे अअरोप अभिनेत्यावर करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय अभिनेत्रीने मालिकेत लीड रोल, मीनी सीरीज मध्ये काम केले आहे.

अभिनेत्रीच्या दाव्यानुसार, तिच्या कंपनीने टेरेस वर पार्टी आयोजित केली होती. तिचा 30 वर्षीय सहकलाकार देखील तेथे आला होता. मात्र तो दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये होता असा तिचा दावा आहे. अभिनेत्रीने तो कलाकार योग्यप्रकारे वागत नसल्याचं म्हटलं आहे.

“पार्टीमध्ये त्याला माझ्यावर आणि अन्य महिलांवर रंग लावायचे होते. पण मला त्याच्यासोबत होळी खेळायची नव्हती. त्यामुळे आक्षेप घेत मी त्याच्यापासून लांब गेले. त्याच्यापासून लपण्यासाठी पाणीपुरीच्या स्टॉलमागे गेले. पण तेथेही तो आला आणि रंग लावायला जबरदस्ती करायला लागला. गालाला रंग लावत तो आय लव्ह यू म्हणाला. आता बघू कोण तुला वाचवायला येतय. नंतर त्याने मला चूकीचे पद्धतीने पकडले आणि माझ्यावर रंग लावला. यानंतर घाबरून मी थेट वॉशरूम मध्ये गेल्याचं” अभिनेत्रीने एफआयआर मध्ये म्हटलं आहे.

संबंधित अभिनेत्याला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍यांसोबतही तो अरेरावीने वागत असल्याचं म्हटलं आहे. “अभिनेत्रीच्या तक्रारीवरून आम्ही आरोपी कलाकारावर गुन्हा दाखल केला आहे. आम्ही त्याला नोटीस बजावली आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही उपस्थित असलेल्या इतरांचे जबाब नोंदवणार आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणार आहोत,” असे अधिकारक्षेत्रातील पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकाने सांगितले असल्याचं इंडियन एक्सप्रेसचं वृत्त आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *