लाडकी बहीण योजनेमुळं शिक्षकांचा पगार उशिरा? पगारासाठी वाट पाहावी लागणार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नवीन वर्षात शिक्षकांचे पगार उशिरानं होण्याची शक्यता आहे. दरमहिन्याला होणारा पगार दोन ते तीन दिवसांनी उशिरानं होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात शिक्षकांचे पगार उशिरानं होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नव्या वर्षात शिक्षकांना पगारासाठी वाट पाहावी लागू शकते. यासंदर्भातील एक कारण लाडकी बहीण योजनेनं सरकारवर आलेला आर्थिक भार असल्याचं बोललं जातंय.

1 ते 5 तारखेदरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात. यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार त्या कालावधीत होत असतात. पण, त्यासाठी जी सगळी कागदपत्र असतात त्याची पूर्तता 15 तारखेपर्यंत होणं आवश्यक असतं. त्यानंतर रक्कम मिळत असते. योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद काल करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणूनच शिक्षकांचा पगार जो 1 ते 5 तारखेपर्यंत होत असतो तो उशिरानं होऊ शकतो. म्हणजेच नववर्षात 2 ते 3 दिवस उशिरानं शिक्षकांचा पगार होऊ शकतो.

शिक्षण विभागाची धावपळ सुरु
नवीन वर्षात शिक्षकांचे पगार दोन ते तीन दिवसांनी उशिरा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरी वर आर्थिक भार आल्याने शिक्षकांच्या पगारासाठीची तरतूद रखडली होती. रात्री उशिरा ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. नेहमी 15 तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची रक्कम वर्ग करण्यात येते. डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्याने यासाठी उशीर झाल्याची माहिती आहे. लवकरात लवकर पगार करण्यासाठी आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे.

सोलापूरमध्ये 13 हजार शिक्षकांचा पगार रखडणार

नववर्षाच्या सुरुवातीलाच सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील जवळपास 13 हजार शिक्षकांचे पगार एक तारखेला होणार नाहीत. 13 हजार शिक्षकांसाठी जवळपास 90 कोटी रुपये पगार साठी लागत असतात. साधारणपणे पगाराची रक्कम 20 तारखेला वेतन अधीक्षकांना प्राप्त होतो. त्यानंतर प्रक्रिया करून एक तारखेपर्यंत हे पगार शिक्षकांना दिले जातात. मात्र, 27 डिसेंबरपर्यंत अद्याप राज्य शासनाच्या वतीने हे पगार जमा करण्यात आलेले नाही. तसेच पुढील दोन ते तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे जरी शासनाच्या वतीने आज हा निधी जमा झाला तरी एक तारखेला शिक्षकांना पगार मिळणार नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीला माध्यमिक विभागात शिकवणाऱ्या शिक्षकांना पगारासाठी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *