ईद सणाचा फायदा घेत दूध दरात मोठी वाढ, प्रति लिटर ₹96 दराने विक्री

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आज साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फित्र सणाच्या तयारीसाठी मुस्लिम बांधवांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे. विशेषतः शीर खुर्मा व अन्य पारंपरिक गोड पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत स्थानिक दूध विक्रेत्यांनी दरात मोठी वाढ केली असून सध्या तबल्याचे खुले दूध (Milk) प्रति लिटर ₹96 दराने विकले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

दरम्यान, दूध कंपन्यांचे पॅकेट दूध मात्र ₹56 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. परंतु खुले दुधाची मागणी (Milk Price) जास्त असल्याने दूध माफियांकडून दुधाची दरवाढ मोठ्या प्रमाणात केल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत आहे. भिवंडी शहरातील डेऱ्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी दुधाच्या अवाजवी दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा
गुढीपाडवा व मराठी नववर्षा सोबत आलेली रमजान ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ व्हावे. रमजान ईदच्या निमित्तानं वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोप्यानं, आनंदानं आणि उत्साहानं साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधूत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान ईदनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांसोबतच सर्वधर्मीय नागरिकही या सणाच्या आनंदात सहभागी होतात. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षासोबत आलेली यंदाची रमजान ईद वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *