यंदाचा आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, यंदा हा प्रतिष्ठेचा स्पर्धा अबू धाबी आणि दुबई या संयुक्त अरब अमिरातीतील दोन प्रमुख शहरांमध्ये रंगणार आहे.या वेळी एकूण आठ संघ या टी-20 फॉरमॅटमधील स्पर्धेत भाग घेणार आहेत.
पण या स्पर्धेपूर्वी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल?सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने चिंता वाढवली होती.भारताचा सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या स्पोर्ट्स हर्निया या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे.यासाठीच तो नुकतेच इंग्लंडला उपचारांसाठी गेला होता.
त्यामुळे आशिया कपमध्ये तो उपलब्ध असतील का, आणि त्यांच्याऐवजी दुसरा कर्णधार नेमला जाणार का, हे मोठं प्रश्नचिन्ह बनलं होतं.ताज्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव लवकरच पूर्णपणे फिट होणार आहेत. पुढील दोन आठवड्यांत तो तंदुरुस्त होतील आणि लवकरच सरावालाही सुरुवात करतील.त्यामुळे ही बाब आता स्पष्ट झाली आहे की, 2025 आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवच टीम इंडियाचे कर्णधार असतील.