लेखणी बुलंद टीम:
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना घरात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला होता. दोघांची भांडणं, रुसवे-फुगवे यामध्ये घरातल्यांची झालेली फरफट यामुळे सगळेजण वैतागले होते. रितेशने सुद्धा भाऊच्या धक्क्यावर अरबाजला विनाकारण पाठिशी घातल्याबद्दल टीम B ला जाब विचारला. अखेर रितेशने अरबाजने केलेल्या ड्रामाची क्लिप घरातल्या सर्व सदस्यांना दाखवली आणि यामुळे सगळेच थक्क झाले.
घरात सर्वांसमोर भांडणारे निक्की-अरबाज, रात्री एकटेच व्यवस्थित बोलत होते. तसेच घरातल्यांसमोर आता कसं वागायचं यावर या दोघांची चर्चा सुरू होती. वैभव आणि जान्हवीला हा व्हिडीओ पाहून सर्वात मोठा धक्का बसतो. अरबाजचं नाटक उघड झाल्यावर आता घरात सगळेजण त्याची नक्कल करू लागले आहेत. आजच्या भागात चक्क सूरज अरबाजची नक्कल करताना दिसणार आहे.
सूरजने केली अरबाजची नक्कल
सूरज अरबाजची नक्कल करणार आहे. तर, डीपी दादा वैभवची आणि निक्कीची नक्कल जान्हवी करणार आहे. अरबाज बेडरुममध्ये “हिला माझ्याजवळ येऊ देऊ नका मला त्रास होतोय” असं सगळ्या घरासमोर ओरडून सांगत होता. तो सीन हे तिघेही गार्डन परिसरात रिक्रिएट करणार आहेत. सूरज, वैभव आणि जान्हवीने अनुक्रमे अरबाज, वैभव आणि निक्की यांची नक्कल अगदी हुबेहूब केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून सूरजचं विशेष कौतुक केलं आहे. “सूरजचा अभिनय कमाल आहे”, “हे असं काहीतरी दाखवा मस्तच”, “खूप भारी dp दादा, सूरज”, “शोमध्ये निक्की-अरबाज एवढंच दिसतंय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमो पाहून दिल्या आहेत.
पहा प्रोमो:
instagram.com/reel/C_Ze82oSb9S