“सुनील टिंगरे, तुम्ही खुनी आहात, रक्त बदलण्याचे पाप तुम्ही केले”- सुप्रिया सुळे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाने देशात मोठी खळबळ उडाली होती. यात पोलीस आणि ससून रुग्णालय, बाल न्याय मंडळाच्या भूमिकेने तर व्यवस्थेविरोधात एकदम चीड निर्माण झाली होती. त्यानंतर या प्रकरणावरून शरद पवार यांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर आता सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत सुनील टिंगरे, तुम्ही खुनी आहात, असा घणाघात केला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सु्द्धा कोडींत पकडले.

सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार प्रहार

सुनील टिंगरे, तुम्ही खुनी आहात. रक्त बदलण्याचे पाप तुम्ही केले. पोर्शे कार अपघातावरून सुप्रिया सुळे यांनी जोरदार टिका केली. तुमच्या दोन्ही हातावर खून आहे, सुप्रिया सुळेंचा सुनील टिंगरेंवर आरोप केला. पोर्शे कार आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? मी स्वतः सुनील टिंगरे विरोधात प्रचार करणार, जंग जंग पछाडणार. त्या आईला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला जाता हे पोलीस स्टेशन आहे, तुमच्या घरातलं डायनिंग टेबल नाही. ही मस्ती घरी दाखवायची, तुमची मस्ती सर्वसामान्य माणसांच्या अश्रूसमोर चालणार नाही, अशी घणाघाती टीका सुळे यांनी केली.

गरीबांच्या आयुष्याची किंमत ही कराल? पोर्शवाल्यांना बिर्याणी द्याल, असा सवाल त्यांनी केला. सुनील टिंगरेंना यावेळेस घरी पाठवा, ती जबाबदारी तुमच्यावर आहे. कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागणार, तुम्ही भ्रष्टाचारी आहात माझा आरोप आहे. तुम्ही खुनी आहात, रक्त बदलण्याचं पाप तुम्ही केलं? त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन कोणी केला? रक्त बदलण्यासाठी फोन कोणी केला? देवेंद्र फडणवीस यांनीच याची उत्तर द्यावीत? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान या आरोपानंतर सुनील टिंगरे यांची उमेदवारी कापण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण अजित पवार यांनी या सर्व चर्चांना विराम दिला आहे. सुनील टिंगरे यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *