‘लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांमुळे एसटी तोट्यात’-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचं राज्य सरकार वारंवार फेटाळत आलं आहे. आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं आहे. पन्नास टक्के दिलेल्या सवलतीमुळेच एसटी तोट्यात गेली आहे. महिलांना व जेष्ठांना एसटी प्रवासात सवलतीमुळे एसटीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतो. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही, असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये केलं आहे. व्हाईस ऑफ मेडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या, अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे महायुती सरकारच्या एसटी प्रवासात महिलांच्या सवलत योजनेमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुलीत जणू परिवहन मंत्री यांनी दिली आहे.

गेल्या सरकार काळामध्ये महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली. तर ज्येष्ठांना मोफत बस देण्याची योजना आणण्यात आली. यानंतर महिलांनी मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास केल्याची आकडेवारी महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केली होती. या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून राज्य सरकार करण्यात आला. मात्र, राज्य सरकारने हे आरोप फेटाळले होते. आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जाहीर कबुली दिली आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?
महिलांना,ज्येष्ठांना देण्यात आलेल्या सवलतीमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली. यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतो आहे, असे सरनाईक म्हणाले. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्ये केले. लाडक्या बहिणींना बस मध्ये 50% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे. अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर मला असं वाटतं महामंडळ चालवणं कठीण होईल, त्यामुळे सध्या तरी या मागणीचा मी विचार करू शकत नाही. गाव खेड्यापर्यंत एसटी पोहोचली पाहिजे. ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे पुढे ते म्हणालेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *