सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) हॉरर कॉमेडीची (Horror Comedy) चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आधी मुंज्या, त्यानंतर स्त्री 2 (Stree 2) आणि आता भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) सारखे हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. हे झालं बॉलिवूडपटांचं, पण सध्या साऊथ इंडस्ट्रीमध्येही (South Industry) हॉरर कॉमेडीच्या चर्चा आहेत. साऊथ इंडस्ट्रीत लवकरच बहुचर्चित हॉरर फिल्म रिलीज केली जाणार आहे. या चित्रपटाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. ‘कतानार: ‘द वाइल्ड सॉर्सर’ (Kathanar – The Wild Sorcerer) असं या चित्रपटाचं नाव आहे. या हॉरर चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवी अपडेट समोर येत आहे. कटनारचं शुटिंग पूर्ण झालं असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
हॉरर चित्रपट कतानार तुम्हाला अशा जगात घेऊन जातो, ज्याचा अनुभव तुम्ही यापूर्वी कधीच घेतलेला नाही. चित्रपटाचे प्रचंड सेट्स आणि अप्रतिम VFX प्रेक्षकांना एक नवा सिनेमॅटिक अनुभव देतात. चित्रपटात रहस्य, थरार आणि भावनांचा जबरदस्त मिलाप आहे. कटानार ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेशी आहे.
कतानारची शानदार झलक
कतानारची स्टारकास्ट कमाल आहे. चित्रपटात जयासूर्या, अनुष्का शेट्टी आणि विनीत यांसारखे दिग्गज कलाकाल आहेत. चित्रपटाचं शुटिंग 45000 वर्ग फुटांच्या विशाल अशा महाकाय स्टुडिओमध्ये करण्यात आलं आहे. कतानारचं बजेट जवळपास 90 कोटी रुपयांचं असल्याचं सांगितलं जात आहे. कतानार एक मल्ल्याळम फिल्म आहे, जी रोजिन थॉमस यांनी दिग्दर्शित केलेली आहे. कतानार 14 भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. इंग्लिश, तमिल, तेलुगू, हिंदी, बंगाली, कन्नड़, चाइनीज, फ्रेंच, कोरियन, इटालियन, रशियन, इंडोनेशियन आणि जापनीस अशा तब्बल 14 परदेशी भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. रिलीज झाल्यानंतर ‘कतानार: ‘द वाइल्ड सॉर्सर’ बॉक्स ऑफिस हादरवून टाकणार आहे, यात काही शंका नाही.