‘या’ टीम इंडियाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलाने केली लिंग बदल शस्त्रक्रिया

Spread the love

भारतीय क्रिकेट टीमचे माजी ऑलराऊंडर आणि टीम इंडियाचे माजी फलंदाजी कोच संजय बांगर चर्चेत आहेत. त्यांचा मुलगा आर्यन बांगरने असं एक पाऊल उचललय, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. मुलगा म्हणून जन्माला आलेल्या आर्यनने सेक्स चेंज ऑपरेशन केलय. तो आर्यनचा आता अनाया झालाय. अनाया बनून तो आता खुश आहे. वडिलांप्रमाणे क्रिकेट विश्वात नाव कमावण्याच त्याचं स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही. पुरुष क्रिकेटपटू म्हणून त्याचं करियर संपुष्टात आलय.

भारतीय क्रिकेटमध्ये एक क्रिकेटपटू, कोचची भूमिका निभावणारे संजय बांगर इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीच्या RCB चे कोच होते. त्यांचा मुलगा आर्यन आता अनाया बनलाय. आपली ही नवीन ओळख त्याने जाहीर केलीय. पुरुषाची स्त्री म्हणजे आर्यनची अनाया बनल्यानंतर त्याने रविवारी रात्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. इन्स्टाग्राम हँडलवर 10 महिन्यांपासूनचा हार्मोनल चेंज संघर्षाचा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर केला.

पहा पोस्ट:

instagram.com/p/DAPHqRAMy-S

आर्यनने अनाया बनल्यानंतर काय म्हटलं?

अनायाने मागच्या 11 महिन्यात एचआरटीमुळे (हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी) झालेल्या बदलांवर व्हिडिओ बनवून आपल म्हणणं सर्वांसमोर ठेवलं. सर्जरीनंतर जवळपास 11 महिन्यांनी एक वेगळी ओळख मिळाली आहे. या कठीण निर्णयानंतर आता क्रिकेट सोडावं लागेल असं म्हटलं आहे. “ज्या खेळावर मी प्रेम करतो, माझी आवड आहे, तो मला सोडावा लागेल, याचा विचारही मी कधी केला नव्हता. हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी (HRT) नंतर आता ट्रान्स महिला बनून शरीरात खूप बदल झालाय. स्त्री बनल्यामुळे मांसपेशी, ताकत आणि एथलेटिक क्षमता गमावल्याचे त्याने म्हटलं आहे. दीर्घकाळापासू मी ज्या खेळावर प्रेम केल, ते आता माझ्यापासून लांब जात आहे” असं अनायाने इन्स्टापोस्टमध्ये म्हटलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *