राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण 38 निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, कोतवालांच्या मानधानात 10 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची (Election) घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल. त्यामुळे, राज्य सरकारच्यावतीने जास्तीत जास्त निर्णय घेऊन जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण, विधानसभा निवडणुकांनंतर नवीन सरकार स्थापन होईल. तत्पूर्वी बैठकांचा आणि निर्णयांचा धडाका सुरू आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील 38 निर्णय
कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू
(महसूल विभाग)
ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
(नियोजन विभाग)
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार.
एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
(नगर विकास विभाग)
ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
(नगर विकास विभाग)
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
(नगर विकास विभाग)