नवी मुंबई येथील समाजसेवक श्रीधर मढवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंतीची मागणी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

जनतेच्या हितासाठी निवडणूक निर्णय अधिकारी ह्या बाबी लक्षात घेणार का?

जनतेच्या टॅक्सच्या पैशावर नुसत्या जाहिराती करुन काम भागत नाही तर मतदारांच्या अडचणी समजणे व त्या सोडवणे गरजेचे आहे. जर मतदार नोंदणी सुलभ केली तर मतदारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढेल.

१) मतदार याद्या कधीच १००% बरोबर नसतात. हि वर्षानुवर्षे ताटकळलेली प्रक्रिया आहे. यासाठी दुबार नावे बुक होण्यापासून वाचवणे हे पहिले काम आहे. राष्ट्रीय स्थरावरील अँप मध्ये अश्या चुका होणे अपेक्षित नाही. पूर्ण नाव, जन्मतारीख ठिकाण पुन्हा येऊ शकत नाही आलेच तर अँप मध्ये तसा इशारा देण्यात यावा कि सदर नाव या आधीच नोंदले गेलेलं आहे. त्यामुळे एकाच नावाची एन्ट्री एका भागात होण्यापासून रोखता येते.

२) मयत लोकांची नावे रद्द करण्यासाठी काही सोप्या उपाय यॊजना केल्या पाहिजेत, पालिका स्तरावर स्मशानाच्या नोंदी नुसार तसेच वार्ड मध्ये मृत्यूचे दाखले दिल्यावर सदर माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदार यादी मधून सदर नाव परस्पर कमी झाले पाहिजे व अशा कामाला कोणाचा अडथळा येणार नाही. एका एका भागाच्या यादी मध्ये अशी शेकडो नावे पडून आहेत पण अधिकारी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात व मतदार याद्या विनाकारण मोठ्या होतात त्या कमी करणे अधिकाऱ्यांच्या हातात आहे.

३) ऑनलाईन ज्या याद्या आहेत त्यात तर मूर्ख पणाचा कळस आहे. सदर याद्या तपासणे फार कठीण करून ठेवले आहे. सिस्टिम मधेय फक्त स्वतःचे नाव शोधण्याची सोय फार चांगली आहे, पण अभ्यासू नागरिकांची सोय अजिबात नाही. एखाद्या यादी क्रमांकाची यादी पाहता येणे गरजेचे आहे. तसेच त्याची प्रिंट काढता आली पाहिजे पण तसे होत नाही. एखाद्या प्रभाग क्रमांकाची यादीच फक्त पहायची सोय असणे गरजेचे आहे. पूर्वी अशी सोय होती त्यामुळे सोपे जात होते. त्या त्या प्रभागाचा डेटा मतदारांना उघड करण्यात काय अडचणीचे आहे?

४). मतदाराचे नाव टाकण्या विषयी बऱ्याच अडचणी आहेत. जास्त वय असल्यावर काय करायचे. नवीन नाव नोंदणी करण्याचे काम सोपे व्हावे जेणे करून शेवटच्या व्यक्ती पर्यंत मतदानाचा हक्क राहील.

एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात नाव टाकणे सोपे करणे गरजेचे आहे. क्लिष्ट प्रक्रियेमुळे मतदाराचे नाव स्थलांतरित होत नाही. बरेच लोक १०-१० वर्षे प्रभागात रहातात पण मतदार यादीत नाव टाकणे कठीण असल्यामुळे तो मतदानाचा हक्क बजावू शकत नाही हि आपल्या देशाची शोकांतिका.

पण हे सुचवणारा कोणी सुज्ञ अधिकारी येणे हि तितकेच गरजेचे आहे. या विषयी बऱ्याच अधिकाऱ्यांशी बोललो आहे पण कोणाकडून काहीच झाले नाही. जुईनगर विभागात माझ्याकडे माहिती घेण्यासाठी बरेच बी.एल.ओ. येत असतात व ते खात्रीने माझ्याकडे मतदारांची माहिती घेण्यासाठी येतात. मी स्वतः आमच्या जुई नगर येथील प्रभागाचा डेटा जमा केला आहे व त्यात लोकांना अडचणी येणार नाही अशीच प्रणाली विकसित केली आहे.

वर नमूद केलेल्या सूचना ह्या भासत असलेल्या अडचणी मधून केल्या आहेत त्या जर आमलात आणल्या तर मतदारांना सोयीचे होईल व मतदार वाढतील व याद्या परिपूर्ण होतील यात शंका नाही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *