महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना दोन ठिकाणांहून अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितनुसार बुधवारी कल्याण आणि भिवंडी येथे टाकलेल्या छाप्यांनंतर ही अटक करण्यात आली. विशिष्ट माहितीच्या आधारे, पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने (AEC) ३० एप्रिल रोजी कल्याण पूर्वेतील गणेश नगर येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान चार बांगलादेशी महिलांना पकडण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.