सारखच आंबट ढेकर, छातीत जळजळ होतंय, ‘हे’ असू शकत त्याच्यामागील कारण

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

चांगल्या पाचन क्रियेमुळे प्रकृती तंदुरुस्त राहते. खराब पाचन क्रियेमुळे संपूर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ज्यावेळी खाणं व्यवस्थित पचत नाही, त्यावेळी पोषक तत्व सुद्धा शरीराला पूर्णपणे मिळत नाहीत. खराब पाचनक्रियामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोकांना सतत एसिडिटी होत असते. त्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ अशा समस्या निर्माण होतात. जर, नेहमीच असा त्रास होत असेल, तर काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

पोटात आधीपासून एसिड असतं. खाण पचवण्यात हे एसिड मदत करतं. पण काही चुकांमुळे शरीरातील एसिडच प्रमाण वाढतं. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येऊ लागतात. काहीवेळा औषधांच सेवन आणि प्रेग्नेंसीमुळे सुद्धा एसिडिटी होऊ शकते. जर एसिडिटी सतत होत असेल, तर यामागे काय कॉमन कारण आहे ते जाणून घ्या.

का एसिडिटी चाळवते?

जे काही आपण खातो ते पचवण्यासाठी फिजिकल एक्टिविटी आवश्यक आहे. जर जेवल्यानंतर तुम्हाला बसून राहण्याची किंवा झोपून जाण्याची सवय असेल, तर त्यामुळे सुद्धा एसिडिटी चाळवू शकते.

रात्री जेवल्यानंतर काय टाळलं पाहिजे?

जेवल्यानंतर तुम्ही लगेच चहा-कॉफी पीत असाल, तर एसिड रिफलेक्सची समस्या निर्माण होऊ शकते. खासकरुन रात्री जेवल्यानंतर चहा-पाणी पिणं टाळा. अन्यथा अडचण येऊ शकते.

एसिड रिफलक्स

रात्री एसिड रिफलक्स होण्यामागे दोन कारणं असू शकतात. एक उशिरा जेवण त्यानंतर लगेच झोपणं. दुसरं चुकीच्या पोजीशनमध्ये झोपणं. रात्री पोटावर झोपल्यास एसिड रिफलक्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

का एसिडिटी वाढते?

खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्याचा थेट परिणाम पचनावर होतो. जास्त जंक फूड, मसालेदार तळलेलं खाणं, जास्त चहा-कॉफीच सेवन अशा गोष्टींमुळे सुद्धा एसिडिटी वाढते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *