गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या श्री.सयाजीनाथ महाराज विद्यालयातील 14 वर्ष वयोगटा खालील मुलींच्या खो-खो संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी शेवगाव, अहमदनगर या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या .त्यामध्ये पुणे विभागातुन एकूण सात संघ सहभागी झाले होते. यामधील अंतिम सामन्यांमध्ये अहमदनगर ग्रामीण बरोबर झालेल्या स्पर्धेत विद्यालयाने अहमदनगर ग्रामीण चा चार गुणांनी पराभव करत विजय खेचून आणताना संघातील कु अपर्णा वर्धे,राऊ बिराजदार, रोहिणी सुलाखे, आराध्या गीते, यांचे संरक्षण आणि आरती घटटे,श्रेया जाधव,साक्षी दरेकर, प्रणिती गवते यांच्या उत्कृष्ट आक्रमणाच्या जोरावर श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय खो खो संघाने स्वता वरचा 1 गुणांचा लीड तोडुन विभाग स्तरावर जिंकून प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्पर्धेसाठी विद्यालयातील संघाची निवड झाली आहे .या यशाबद्दल पंचक्रोशीतील पालकांकडून खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होत आहे .
विद्यालयातील या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री रामभाऊ मोझे, शालेय समिती अध्यक्षा प्रा. श्रीमती. अलकाताई पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री .ज्ञानेश्वर मोझे, विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजकुमार गायकवाड या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .या खेळाडूंना विद्यालयातील क्रीडाशिक्षक श्री .संजय जैनक, मार्गदर्शक श्री .अविनाश करवंदे, श्री. गजानन ढोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.