लेखणी बुलंद टीम:
श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २ (Stree 2) चित्रपटाने पहिल्यांच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. चित्रपटाने १०० कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
अभिनेत्री कंगणा रणौतने या चित्रपटात काम करणाऱ्या सर्व टीमसह दिग्दर्शक अमर कौशिक यांचे कौतुक केले आहे. हेही वाचा- हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे अनेक विक्रम हॉर्रस कॉमेडी स्री चित्रपटाच्या पहिला सिक्वेलने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. तर स्री २ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४६ कोटींची कमाई केली. यासह, स्री २ ने देशांतर्गत बॉस्क ऑफिसवर एकूण 54.35 कोटी रुपयांची कमाई केली. स्त्री 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे.