लेखणी बुलंद टीम:
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये एका महिलेने इंस्टाग्राम रीलच्या जाळ्यात अडकून स्वतःचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. हे प्रकरण 30 नोव्हेंबरचे असून यामध्ये महिलेने ‘पार्ट टाइम जॉब’च्या आमिषाने आपले पैसे गमावले.
मिळालेल्या माहितीनुसार महिलेने इंस्टाग्रामवर एक रील पाहिली, ज्यामध्ये पार्टटाइम जॉब सांगितला होता. रीलवर क्लिक केल्यानंतर ती एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागाई झाली. तेथे आरोपीने स्वत:ची ओळख “जॉब को-ऑर्डिनेटर” म्हणून करून दिली आणि त्या महिलेला कामाची सविस्तर माहिती दिली.
तसेच पीडितेने सांगितले की, सुरुवातीला तिला काही पैसेही मिळाले होते, त्यामुळे तिला वाटले की हे काम योग्य आहे आणि त्यातून अधिक पैसे मिळू शकतात. या विश्वासानंतर, आरोपीने महिलेला अधिक पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जेणेकरून तिला मोठा परतावा मिळू शकेल. यानंतर महिलेने आणखी पैसे गुंतवले. पण काही वेळाने आपण बळी पडल्याचे लक्षात येताच तिने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून या सायबर घोटाळ्यातील आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे.