धक्कादायक! आधी करंट लावून पतीची हत्या केली नंतर मृतदेहासमोर बनवले शारीरिक संबंध

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

समस्तीपुरमधील सोनू झा खून प्रकरणात त्याची पत्नी अस्मिता आणि तिचा कथित प्रियकर ट्यूशन टीचर हरिओम यांना अटक करण्यात आली आहे. अस्मिताने आपल्या पतीची हत्या केल्यानंतर मृतदेहासमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
“मी माझ्या प्रियकरासोबत खोलीत होते. रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास माझा पती सोनू ई-रिक्शा घेऊन नशेत घरी आला. पती येत आहे याची मला आणि माझ्या प्रियकराला काहीच कल्पना नव्हती. खोलीत येताच पती सोनूने मला माझ्या प्रियकर हरिओमसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं,” असं अस्मिता झा म्हणाली. अस्मिता ही तीच स्त्री आहे जिने सोनम, मुस्कान, शशी आणि सुष्मितालाही मागे टाकले आहे. तुम्ही विचार करत असाल, कोणत्या बाबतीत? बरोबर ना? चला, तर मग तुम्हाला ही संपूर्ण कहाणी सुरुवातीपासून सांगतो.

बिहारमधील समस्तीपुर येथे आणखी एका पतीच्या खुनाने केवळ राज्यच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला आहे. ३० वर्षीय सोनू झा हा व्यवसायाने ई-रिक्शा चालक होता. ८ वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१७ मध्ये, सोनूचं अस्मिता झासोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. वर्षभरापूर्वी हरिओम झा मुलांना ट्यूशन शिकवण्यासाठी घरी येत होता. तो दिवसा यायचा, जेव्हा सोनू घरी नसायचा. याच काळात अस्मिता आणि हरिओम यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. आता इथून खरी कहाणी सुरू होते.
करंट लावून पतीची हत्या

शुक्रवारी रात्री सोनूने अस्मिता आणि तिचा प्रियकर हरिओम यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर सोनूने हरिओमला मारहाण सुरू केली. पती नशेत असल्याचा फायदा घेत प्रियकराने भांड्याने, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून त्याला अर्धमेला केला. त्यानंतर विजेच्या तारांनी त्याचा गळा आवळला. शेवटी, सोनूच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी त्याला करंट दिला.

मृतदेहासमोर बनवले शारीरिक संबंध

पत्नीची क्रूरता इथेच थांबली नाही. अस्मिता आणि हरिओमने मृतदेहासमोर प्रथम शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हरिओम फरार झाला. ही घटना घडवून आणल्यानंतर सकाळी अस्मिताने गोंगाट सुरू केला की, करंट लागल्याने सोनूचा मृत्यू झाला आहे.

भांड्याने मारून पतीची हत्या

जेव्हा सून अस्मिताने गोंगाट सुरू केला, तेव्हा सोनूचा पिता टूनटून झा खोलीत पोहोचला. त्याने पाहिलं की, भिंतीवर रक्ताचे डाग आहेत आणि बिछानाही रक्ताने माखला आहे. जमिनीवर माझा मुलगा सोनू झाचा मृतदेह पडला होता. त्याच्या डोळ्यांना सूज आली होती, पाठीवर लाठ्याने मारहाण केल्याचे १० ते १५ डाग होते. त्याचबरोबर त्याच्या डाव्या हाताची बोटं जळाली होती, असं टूनटून म्हणाला. त्याला लगेच समजलं की, त्याच्या मुलाची हत्या झाली आहे, करंटमुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

हरिओम फरार

घटनास्थळी उपस्थित मुफस्सिल पोलिसांनी तपास सुरू केला. दुपारी एएसपी संजय पांडे यांनी सांगितलं, “सोनू झाच्या डोक्यावर आणि बोटांवर जखमांचे निशान आढळले आहेत. घटनास्थळी रक्त पसरलेलं आढळलं आहे. तसेच, विजेची तारही आढळली आहे. सध्या हरिओमचा शोध सुरू आहे.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *