धक्कादायक! रुग्णालयातील लिफ्ट कोसळल्याने महिलेचा मृत्यू तर तीन जखमी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेरठच्या (Meerut) शास्त्री नगरमध्ये गुरुवारी एक भीषण अपघात झाला. हापूर चुंगी येथे असलेल्या कॅपिटल हॉस्पिटलची लिफ्ट अचानक तुटून पडली. त्यावेळी लिफ्टमध्ये एक महिला रुग्णासह अन्य तीन जण होते. महिलेची प्रसूती झाली होती. तिला त्याला तळमजल्यावर नेले जात असताना अचानक हा अपघात झाला. लिफ्ट तुटून खाली पडल्याने महिलेची मान लिफ्टमध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर रूग्णालयात उपस्थितांनी गोंधळ घातला आणि तोडफोड केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून लोकांना शांत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. प्रसूती झालेल्या महिलेला लिफ्टमधून खाली आणले जात होते. तळमजल्यावर पोहोचण्यापूर्वी लिफ्टचा पट्टा तुटला तेव्हा तिच्यासोबत इतर रुग्ण आणि परिचर होते. काही सेकंदात लिफ्ट जोरात खाली आली. लिफ्ट खाली पडताच गर्भवती महिलेची मान त्यात अडकली. यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.

कॅपिटल हॉस्पिटल हे मेरठचे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. अपघाताची माहिती मिळताच महिला रुग्णाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून आरडाओरडा सुरू केला. संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या काचा व खाटांची मोडतोड केली. संपूर्ण रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

सिव्हिल लाईनचे सीओ अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये बिघाड झाल्याची शक्यता आहे. सध्या रुग्णालय व्यवस्थापनाने सर्व रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे. या अपघातामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयानी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ही घटना रुग्णालयांमधील सुरक्षा मानके आणि उपकरणांची वेळोवेळी तपासणीच्या अभावाकडे निर्देश करते. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (हेही वाचा:

या अपघातानंतर एसपी सिटी आयुष विक्रम सिंहही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. सर्व पैलूंची चौकशी केली जाईल. आरोपींवरही कारवाई केली जाईल. दुसरीकडे सीएमओ डॉ अशोक कटारिया यांनी सांगितले की, लिफ्ट ओव्हरलोडिंगमुळे बिघडली असावी.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *