धक्कादायक! CA असलेल्या या तरुणाने भयानक पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपवले

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गोल मार्केट परिसरातील एका हॉटेलमध्ये एका चार्टर्ड अकांऊंटट (Delhi CA Suicide) असलेल्या तरुणाने आत्महत्या (Suicide news) केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या तरुणाचे नाव धीरज कंसल असे असून तो फक्त 25 वर्षांचा होता. धीरज कंसल याने अत्यंत भयानक पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपवले. पोलिसांना त्याचा मृतदेह अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला. धीरज कंसल याने एक सुसाईड नोट लिहली होती. यामध्ये त्याने म्हटले आहे की,कृपा करुन माझ्या मृत्यूनंतर दु:खी होऊ नका. मृत्यू ही माझ्या जीवनाचा सर्वोत्तम भाग होता. आत्महत्या करणं वाईट नाही, कारण माझ्यावर कोणाचाही जबाबदारी नव्हती किंवा माझं कोणाशी घट्ट नातं नव्हतं. माझ्यामुळे कोणीही नैराश्यात जाणार नाही, असे धीरज कंसल याने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

धीरज कंसल याने दिल्लीच्या गोल मार्केट परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. धीरजने स्वत:च्या शरीरात हेलिअम गॅस भरुन आयुष्य संपवले. दिल्लीतील बाराखंबा पोलिसांना त्याचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत बेडवर आढळून आला. धीरजच्या तोंडात एक पाईप होता. 28 जुलैला पोलिसांना हॉटेलमधून फोन आला. धीरजने 20 ते 28 जुलै या काळासाठी एअरबीएनबी अॅपवरुन पहिल्या माळ्यावरील खोली बूक केली होती. चेकआऊट करण्याच्या दिवशी हॉटेलचे कर्मचारी धीरज कंसलच्या खोलीजवळ गेले तेव्हा आतमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून घेतले आणि खोलीचा दरवाजा तोडला. आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांना धीरज कंसला याचा मृतदेह बेडवर पालथा पडलेल्या अवस्थेत दिसला.

धीरज कंसल याने तोंडावर एक मास्क घातला होता. हा मास्क एका सिलेंडरला जोडला होता. तसेच धीरज याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:च्या चेहऱ्याभोवती एक प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली होती. धीरजने नळीद्वारे सिलेंडरमधील हेलिअम वायू तोंडावाटे शरीरात भरला आणि आत्महत्या केली. धीरज एकटा पडला होता. हे एकटेपण असह्य झाल्यामुळे धीरजने आयुष्य संपवल्याचे सांगितले जाते.

पोलिसांनी धीरज कंसल याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली. यामध्ये म्हटले आहे की, तुम्हाला माझी फेसबुक पोस्ट मिळाली नाही तर ही सुसाईड नोट मिळेल. मी निघून जात आहे. यासाठी कोणालाही दोषी धरु नये, असे धीरजने चिठ्ठीत म्हटले आहे. धीरज हा त्याच्या घरी एकटा होता. 2003 साली धीरज कंसलच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धीरजच्या आईने दुसरे लग्न केले होते. धीरजला कोणीही भाऊ-बहीण नव्हते.

धीरजने आत्महत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक हेलिअम गॅसचा वापर केला. हेलिअम गॅस शरीरात गेल्यानंतर श्वास घेणेही अवघड होते. शरीरात हेलिअम गॅस पसरल्यावर लगेच फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि माणसाचा श्वास कोंडला जाऊन मृत्यू होतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *